International women's day आंतरराष्ट्रीय महिला दिन
मित्रांनो, दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात सगळीकडे महिला दिन उत्साहात साजरा केला जातो. महिला दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली? कधी झाली? आणि कोणत्या देशातून झाली? आणि 8 मार्चलाच का साजरा केला जातो जागतिक महिला दिवस? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळतील. त्यामुळे नक्की वाचा हा लेख - महिला दिना विषयी सर्व काही...
- महिला दिनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली ?
- आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करावा ही संकल्पना कशी सुचली ?
- 8 मार्च या दिवशीच का साजरा केला जातो महिला दिन ?
- आंतरराष्ट्रीय महिला दिन कसा साजरा केला जातो ?
महिला दिनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली ?
महिला दिन साजरा करण्यामागे कामगार चळवळीशी प्रेरणा आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या कामगार स्त्रियांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निदर्शने केली. कामाचे तास कमी करावेत, मतदानाचा हक्क मिळावा, वेतन वाढ करावी या त्यांच्या मागण्या होत्या.अमेरिकेतील कामगार स्त्रियांनी 8 मार्च रोजी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला.
आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करावा ही संकल्पना कशी सुचली ?
महिला दिन साजरा करण्याची संकल्पना ही अमेरिकेतील क्लारा जेटकिन या एका महिलेची होती. अमेरिकेतील कामगार स्त्रियांनी दिलेल्या ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ, '8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा' असा प्रस्ताव क्लारा जेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत 1910 साली मांडला. आणि तो पासही झाला. त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी 1911 साली पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
8 मार्च या दिवशीच का साजरा केला जातो महिला दिन ?
क्लारा जेटकिन यांनी जेव्हा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनासाठीचा प्रस्ताव परिषदेत मांडला, तेव्हा अशी कोणतीही निश्चित तारीख ठरवली गेली नव्हती. किंवा तसा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये महिलांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याचा दिवस 8 मार्च हाच सर्वानुमते जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय महिला दिन कसा साजरा केला जातो ?
आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. काही देशात महिलांना सुट्टी देखील असते. दरवर्षी महिला दिन एका थीम सह साजरा केला जातो. म्हणजेच त्या वर्षाची विशिष्ट थीम ठरवली जाते. आणि त्या थीमला अनुसरून हा दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. तसेच महिला दिनाविषयी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये जांभळ्या रंगाचा वापर केला जातो. या दिवशी बहुतांश महिला जांभळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करतात. म्हणजे जांभळा रंग हा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.
निष्कर्ष
मित्रांनो... या लेखात आपण सविस्तर जाणून घेतले की, 8 मार्च या दिवशी का साजरा केला जातो महिला दिन? आणि ही संकल्पना कशी सुचली, याची सुरुवात कुठून झाली आणि जगभरात महिला दिन कशा पद्धतीने साजरा केला जातो. आशा आहे की, हा लेख तुम्हाला आवडला असेल.