मराठी भाषा गौरव दिन
Table of content👇👇👇
- मराठी भाषा गौरव दिन का? आणि कधी साजरा केला जातो?
- कवी कुसुमाग्रज यांचे साहित्यातील योगदान
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक
मित्रांनो... आपण दरवर्षी विविध दिवस मोठ्या उत्साहाने साजरे करतो. त्या प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे एक विशेष महत्त्व असते. महिला दिन, बालिका दिन, मातृभाषा दिन, शिक्षक दिन असे विविध प्रकारचे दिवस आपण साजरे करतो. त्याचप्रमाणे, मराठी भाषेच्या गौरवाचा आणि कौतुकाचा एक दिवस आहे, ज्याला मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो. कोणताही विशेष दिवस आपण साजरा करतो तेव्हा तो दिवस निवडण्यामागे एक इतिहास असतो. वर सांगितलेल्या महिला दिन, शिक्षक दिन, मातृभाषा दिन या सर्व दिवसांचे स्वतःचे असे एक विशेष महत्त्व आहे. अगदी तसंच मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागे त्या दिवसाचे महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊयात, मराठी भाषा गौरव दिन का? आणि कधी साजरा केला जातो?
मराठी भाषा गौरव दिन का? आणि कधी साजरा केला जातो?
दरवर्षी 27 फेब्रुवारीला केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात जिथे कुठे मराठी भाषिक बांधव आहेत ते हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंतु, महाराष्ट्रात प्रामुख्याने हा दिवस साजरा केला जातो. आपल्या बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की, 27 फेब्रुवारीलाच मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? तर त्या दिवशी अवघ्या महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा वाढदिवस असतो. आणि म्हणूनच मराठी साहित्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. 21 जानेवारी 2013 रोजी या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
कवी कुसुमाग्रज यांचे साहित्यातील योगदान
कवी कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यात अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. भारतीय साहित्य जगतातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त करणारे ते मराठीतील दुसरे साहित्यिक आहेत. कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान अभूतपूर्व आहे. मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ते प्रतिभावंत कवी, नाटककार, कादंबरीकार, समीक्षक,कथाकार, लघुनिबंधकार होते. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला. भारतीय साहित्य विश्वात नोबेल पुरस्कारा इतकाच श्रेष्ठ मानला जाणारा हा पुरस्कार आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक:
वर्ष |
साहित्यिकाचे नाव |
साहित्यकृतीचे नाव |
1974 |
वि. स. खांडेकर |
ययाती |
1987 |
वि. वा. शिरवाडकर |
विशाखा |
2003 |
गोविंद विनायक करंदीकर |
अष्टदर्शने |
2014 |
भालचंद्र नेमाडे |
हिंदू
जगण्याची समृद्ध अडगळ |