...This country started celebrating Mother Language Day....या देशातून सुरूवात झाली मातृभाषा दिन साजरा करण्याची

जागतिक मातृभाषा दिवस


मित्रांनो, आपली मातृभाषा ही दैनंदिन संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा दुवा म्हणजेच भाषा होय. आपल्या भावना कल्पना विचार नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषा हे उपयुक्त माध्यम मानले जाते.आपले बोलणे विचार करणे हे आपल्या मातृभाषेच्या माध्यमातूनच घडत असते.आपल्या मराठी भाषेप्रमाणे जगभरातील अनेक देशांमधील विविध राज्यांमध्ये त्या त्या देशातील मातृभाषा दैनंदिन व्यवहारासाठी वापरल्या जातात.


  • जागतिक मातृभाषा दिवस 
  • २१ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो  जागतिक मातृभाषा दिन ?
  • बांग्लादेशातून सुरू झालेल्या भाषाग्रह दिवसाचे रूपांतर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनात कसे झाले ?

...This country started celebrating Mother Language Day

कोणतीही मातृभाषा ही त्या संबंधित प्रदेशातील जनसमूहाद्वारे वर्षानुवर्षे वापरली जाते. त्या प्रदेशातील लोकांच्या वैचारिक आणि व्यवहारिक देवाणघेवाणीचे  प्रमुख साधन मानले जाते. पिढ्यान पिढ्या ती भाषा विशिष्ट जनसमूहाद्वारे वापरली गेल्यामुळे तेथील लोकांची त्या भाषेशी घट्ट नाळ जोडलेली असते. जगभरात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात भारतात प्रामुख्याने 22 भाषा वापरल्या जातात आणि त्यातही सोळाशेच्या आसपास मातृभाषा आहेत मग मातृभाषा  दिन साजरा करण्याची सुरुवात नक्की  कोणत्या देशातून झाली आणि कशी वाचा पुढील लेखामध्ये…

  •  ...या देशातून सुरूवात झाली मातृभाषा दिन साजरा करण्याची


....या देशातून सुरूवात झाली मातृभाषा दिन साजरा करण्याची

                                                        

जागतिक मातृभाषा दिवस 



जागतिक स्तरावर भाषा आणि संस्कृतीच्या विविधतेला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फ २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातील तसेच जगभरातील अनेक देशांमधील विविध मातृभाषांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक स्तरावर २१ फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जाताे. युनेस्काेच्या वतीने (संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद ) १७ नाेव्हेंबर १९९९ साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला.



....या देशातून सुरूवात झाली मातृभाषा दिन साजरा करण्याची


२१ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो  जागतिक मातृभाषा दिन ?



जेव्हा भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग निर्माण झाले.तत्कालीन पाकिस्तान सरकारने उर्दू भाषेला पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देणारे धोरण लागू केले. त्यामुळे पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांग्लादेश भागात पाकिस्तानच्या या धोरणाविरुद्ध आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले. या आंदोलनाला आटोक्यात आणण्यासाठी ढाका विद्यापीठात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पाकिस्तानी लष्कराने २१ फेब्रुवारी १९५२ रोजी गोळीबार केला. पूर्व पाकिस्तानात उर्दू भाषा लादू नये सर्व कारभार बंगालीतच असावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती.परंतु पाकिस्तान सरकार काही उर्दू भाषेचा हट्ट सोडत नव्हते. त्यामुळे बंगाली भाषेच्या आग्रहाचे रूपांतर पुढे बांग्लादेश हा स्वतंत्र देशच हवा या मागणीत झाले. या आंदोलनाच्या तीव्रतेपुढे पाकिस्तानी सरकारला माघार घ्यावी लागली आणि बंगाली भाषेला मान्यता द्यावी  लागली. २१ फेब्रुवारी हा दिवस बंगाली भाषेचा आग्रह धरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरला आणि तेव्हापासून पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आताच्या बांग्लादेशात हा दिवस भाषाग्रह दिन म्हणून साजरा होऊ लागला.


बांग्लादेशातून सुरू झालेल्या भाषाग्रह दिवसाचे रूपांतर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनात कसे झाले ?



बंगाली भाषेच्या आग्रहानंतर आणि आंदोलनानंतर बांग्लादेश स्वतंत्र झाला. या भाषेच्या आग्रहामुळे देश स्वतंत्र झाला म्हणून या देशाला नावही बांग्ला भाषेचे देण्यात आले. बांग्लादेश !! त्यानंतर बांग्लादेशाला संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्यत्व मिळाले आणि १९८२ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात बांग्लादेशाने मागणी केली की, मातृभाषेसाठी केलेल्या संघर्षातून निर्माण झालेला बांग्लादेश हा जगातील पहिला देश आहे आणि या लढ्याचा प्रेरणा दिवस २१ फेब्रुवारी संपूर्ण जगाने जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करावा.१९८९ साली संयुक्त राष्ट्र संघाने ही मागणी मान्य केली आणि २१ फेब्रुवारी १९९२ पासून जगातील सर्व देशात २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.



निष्कर्ष


या लेखात आपण जागतिक मातृभाषा दिनाविषयी सर्व माहिती जाणून घेतली . मातृभाषा दिन साजरा करण्याची सुरुवात कोणत्या देशातून आणि कधी झाली. आणि त्याचा इतिहास काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखातून मिळाली असतीलच. आशा आहे की, हा लेख तुम्हाला आवडला असेल.

 


आपण हे देखील वाचू शकता  👇👇👇 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.