मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन जाणून घ्या या दोन दिवसांतील फरक

या लेखात आपण पुढील गोष्टी जाणून घेणार आहोत-


  • मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन या दोन  दिवसांतील फरक
  • मराठी भाषा गौरव दिन म्हणजे काय ?
  • मराठी राजभाषा दिन म्हणजे काय ?
  • जागतिक मातृभाषा दिन म्हणजे काय? 


मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन जाणून घ्या या दोन  दिवसांतील फरक






मित्रांनो... तुम्ही देखील मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन हे दोन्ही दिवस  एकच समजताय का? असं असेल तर थांबा. हा लेख वाचल्यानंतर या दोन्ही दिवसांमधला फरक तुमच्या सहज लक्षात येईल. आणि मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन या दोन्ही दिवसांबद्दल तुमच्या मनात कोणतीही शंका उरणार नाही.



मित्रांनो... तुम्ही मराठी भाषा गौरव दिन marathi bhasha gaurav din  आणि...This country started celebrating Mother Language Day....या देशातून सुरूवात झाली मातृभाषा दिन साजरा करण्याची  हे दोन्ही लेख वाचले असतीलच. आणि यातून तुमच्या लक्षात आले असेल की मराठी भाषा गौरव दिन आणि  जागतिक मातृभाषा दिन याची सुरुवात कशी आणि कुठून झाली आणि त्याचा इतिहास काय आहे. परंतु आपल्यातील बऱ्याच  जणांना  हे माहीतच नाही की मराठी भाषा गौरव दिन, जागतिक मातृभाषा दिन आणि मराठी राजभाषा दिन हे तिन्ही दिवस वेगवेगळे आहेत आणि या तीनही दिवसांचे स्वतंत्र असे एक महत्त्व आहे.


परंतु आपल्याला असा प्रश्न  पडला असेल की मराठी राजभाषा दिन तर आपण साजरा करतोच मग मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन जागतिक मातृभाषा दिन यातील नक्की फरक काय आहे आणि ते कोणत्या कोणत्या तारखेला साजरे केले जातात.

चला तर मग आपण जाणून घेऊयात या तिन्ही दिवसांमधला नेमका फरक काय आहे.....



सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात मराठी राजभाषा दिन म्हणजे काय ?




1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून आपण 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन साजरा करतो. परंतु तेव्हा राज्यकारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता नव्हती. आणि त्यामुळे त्या दिनाचे विस्मरण होत गेले. भारतीय राज्यघटनेतील कलम 347 नुसार जास्तीत जास्त लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याची संविधानात तरतूद आहे. आणि त्त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारनं मराठी राजभाषा अधिनियम 1964 ला सर्वप्रथम आणला. आणि या अधिनियमानुसार मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असेल, असे वसंतराव नाईक सरकारने अधिकृतपणे 1 मे रोजी जाहीर केले. 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. आणि इथून पुढे महाराष्ट्राचा राज्यकारभार मराठीतून चालेल असे अधिकृतपणे या सरकारने जाहीर केले. आणि तेव्हापासून आपण सर्वजण 1 मे हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो.



मित्रांनो मराठी राजभाषा दिन म्हणजे काय हे तर आपण जाणून घेतले. आता आपण पाहूयात मराठी भाषा गौरव दिन म्हणजे काय आणि  तो कधी साजरा केला जातो.




मराठी भाषा गौरव दिन म्हणजे काय ?






महाराष्ट्राचे लाडके कवी, साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा वाढदिवस 27 फेब्रुवारी हा आपण मराठी  भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मराठी साहित्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. 21 जानेवारी 2013 रोजी या निर्णयाची  घोषणा करण्यात आली.


कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान अभूतपूर्व असे आहे. मराठी वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ते प्रतिभावंत कवी, नाटककार, कादंबरीकार, समीक्षक, कथाकार, लघु निबंधकार होते. तसेच त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मराठीला ज्ञान भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले. मराठी साहित्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आणि मराठी भाषेसाठी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल महाराष्ट्र सरकारने 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. आणि 2013 पासून 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. 




जागतिक मातृभाषा दिन म्हणजे काय ?





मित्रांनो... मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे केवळ मराठी भाषेची संबंधित दिवस आहेत. परंतु जागतिक मातृभाषा दिन हा जागतिक स्तरावर भाषा आणि संस्कृतीच्या विविधतेला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे २१ फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये ज्या  ज्या विविध मातृभाषा बोलल्या जातात, त्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, जागतिक स्तरावर 21 फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

 

बांगलादेशाला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाले आणि 1982 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिवेशनात बांगलादेशाने मागणी केली की, मातृभाषेसाठी केलेल्या संघर्षातून निर्माण झालेला बांगलादेश हा जगातील पहिला देश आहे, आणि या लढ्याचा प्रेरणा दिवस 21 फेब्रुवारी संपूर्ण जगाने जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करावा. १९८९  साली संयुक्त राष्ट्र संघाने ही मागणी मान्य केली. आणि 21 फेब्रुवारी 1992 पासून जगातील सर्व देशात हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.



निष्कर्ष


मित्रांनो... या लेखात आपण मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन या दोन्ही दिवसातला फरक अत्यंत सविस्तरपणे समजून घेतला.  तसेच मराठी भाषा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन आणि जागतिक मातृभाषा दिन या तिन्ही  दिवसांचे महत्त्व आपण जाणून घेतले. आशा आहे, की हा लेख तुम्हाला आवडला असेल.





मित्रांनो... जागतिक मातृभाषा दिनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली आणि बांगलादेशाचे त्यात कसे योगदान आहे या मागचा रंजक इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जागतिक मातृभाषा दिनाविषयी सविस्तर वाचा....


👇👇👇👇👇👇👇👇👇






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.