व.पु.काळे यांचे प्रेरणादायी विचार Va. Pu. Kale quotes in marathi




1.

वैयक्तिक टीकास्पद सवयी समाजासाठीच सोडायच्या असतात तेव्हा सभ्यतेच्या मर्यादा इतरांसाठी पाळायच्या नसतात.

 

 

2.

दुःख आणि डोंगर यांच्यात फार साम्य असतं. लांब अंतरावरून दोन्ही गोजिरी दिसतात. एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच. तसंच दुःखाचं. जवळ गेलं की या दोन्ही गोष्टी पार करता येणार नाहीत असं वाटतं. त्यांचं रौद्ररूप लांब गेलं की गोजिरवाणं होतं.

 

 

3.

भित्र्या माणसाला कोण फसवणार ?  अंगात धडाडी असलेली माणसं वाव मिळेल तिथे उडी घेतात. काही उड्या जमतात. काही फसतात. उडी जमली किंवा फसली तरी दोन्ही बाबतीत ती काही ना काही अनुभवाचे माप पदरात टाकून जातेच. त्याशिवाय मूळ इर्षा जोपासली जाते, ते निराळच.

 

 

4.

आपत्ती अशी यावी की त्याचाही इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचंच झालं तर ठेच लागून पडू नये चांगलं दोन हजार फुटावरून पडावं. माणुस किती उंचीवर पोहोचला होता हे तरी जगाला समजेल.

 

 

5.

माणसाचं मन ही एक फार मोठी शक्ती आहे. ती कोणत्या स्वरूपात कुठे, कशी प्रकट होईल हे सांगता येत नाही. प्रकट झाल्यावर ती विधायक होईल की विध्वंसक होईल, हेही सांगणं कठीणच आहे. मला तर मन म्हणजे बाटलीत कोंडलेला राक्षसच वाटतोअफाट शक्ती आणि बुद्धीवर ताबा नाही.

 

 

6.

प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतच ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो.

 

 

7.

कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगला ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे मी वाईट ठरत नाही. आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला पक्क माहित असलं म्हणजे माणुस निर्भय होतो त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागते.

 

 

8.

ज्याच्याशी लढायचंय त्याचा पूर्ण परिचय असावा, हा युद्धाचा पहिला नियम आहे.

 

 

9.

माणूस निराळा वागतोय, बिघडला- कामातून गेला असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो.

 

 

10.

निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात.

 

 

11.

आपण आयुष्यात खूप काही मिळवतो. पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड करतो ते कारणच शेवटी आपल्याबरोबर राहत नाही. मग राहून राहून मनात येतं….. काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो.

 

 

12.

विरोधक एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामांसहित दाखवून देतो.

 

 

13.

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

 

 

14.

पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का? गणित असतं का? मैत्री म्हटलं की खरंतर हिशोब, गणितं, वगैरे व्यावहारिक शब्द टिकतच नाहीत. तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?

 

 

15.

जेवढं घट्ट नातं तेवढे तीव्र मानापान परक्या माणसाला आपलं प्रेमही देणं लागत नाही तसंच रागही

 

 

16.

एखादी वस्तू मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते, तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल.

 

 

17.

सांत्वन म्हणजे दुःखाचं मूल. मूल आई पेक्षा मोठं कसं होईल ? मुल मोठ व्हायला लागलं की आई आणखीन मोठी व्हायला लागते म्हणून समजूत घालणारं कोणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.

 

 

18.

जेवढे उंच शिखर निवडाल तेवढे सोबती कमी

 

 

19.

पुरुषांपेक्षा स्त्री मला कायम जास्त कणखर वाटते. कितीतरी असह्य, जीवघेणे प्रसंग पेलवून नेण्याची ताकद असते तिच्यात !! दडपण आलं म्हणून स्त्री व्यसनाधीन होत नसते. हे त्यांचंच उदाहरण. सगळं दुःख पचवून चेहरा कायम हसरा ठेवण्याचे सामर्थ्य असते तिच्यात !!!

 

 

20.

देखणी माणसं सगळ्यांनाच मोहात पाडतात. पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपलेपणाची भावना कधी निर्माण होईल? तो प्रेमळ असेल तर. लाघवी, नम्र, मनमिळाऊ असा वैष्णवजन असेल तर. उन्मत्त सौंदर्यावर कोण लुब्ध होईल ?

 

 

21.

बोलायला कोणी नसणं यापेक्षा आपण बोललेले समोरच्यापर्यंत न पोहोचणं ही शोकांतिका जास्त भयाण

 

 

22.

प्रेम हाही एक तऱ्हेचा वातच आहे. वात झालेला माणूस दहा- दहा माणसांना आवरत नाही. प्रेमात पडलेला माणूस पण अनावर असतो.

 

 

23.

समोर बसलेली व्यक्ती, प्रत्येक क्षणी तुमचं ऐकत असतेच असं नाही. त्याच्या कानावर जे जे पडतं ते ते मनावर उमटेनासं झालं की तेवढ्यापुरतं बहिरेपण येतंते बहिरेपण चेहऱ्यावरही उमटतं. अर्थात तो चेहरा वाचण्याचे भान बोलणाऱ्याला हवं. चेहऱ्यावर मजकूर उमटेनासा झाला, की कान मनापर्यंत पोहोचला नाही हे जाणावं.

 

 

24.

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी, जगावेगळी समस्या उभी राहिली तर त्याप्रसंगी तो कसा वागेल, हे सांगता येत नाही.

 

 

25.

ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथे स्पीड कमी करावा इतकच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा.



-----



 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.